Pimpri: आझम पानसरे यांचा ‘तो’ ‘व्हिडीओ’ व्हायरल; कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महापौर आझम पानसरे यांचा काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला जुना ‘व्हिडीओ’ गेल्या दोन दिवसांपासून  सोशलमिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. या ‘व्हिडीओ’मुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून भाईंनी भाजपसोडून पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला की काय? अशी चर्चा रंगली होती. परंतु, हा ‘व्हिडीओ’ जुना असून आझम पानसरे भाजपमध्येच असून ते कोठेही जाणार नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात नुकतेच सत्तांतर झाले. भाजपची धूळधान करत काँग्रेसने राज्यावर कब्जा केला. त्यानंतर महाराष्ट्रातील 2014 च्या निवडणुकीवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले नेते, पदाधिका-यांची पुन्हा घरवापसी होणार असल्याची चर्चा रंगली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील सोडून गेलेले अनेक नेते पुन्हा परतणार असल्याची वक्तव्य केले. त्यामुळे चर्चेमध्ये जोर भरला होता.

पिंपरी-चिंचवड शहरातील आमदार देखील राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. परंतु, या आमदारांनी त्याचे खंडन केले होते. आता माजी महापौर व भाजपचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांचा काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला जुना ‘व्हिडीओ’ गेल्या दोन दिवसांपासून  सोशलमिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. या ‘व्हिडीओ’मुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून भाईंनी भाजपसोडून पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला की काय? अशी चर्चा रंगली होती. परंतु, हा ‘व्हिडीओ’ जुना असून आझम पानसरे भाजपमध्येच असून ते कोठेही जाणार नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. जुना ‘व्हिडीओ’ व्हायरल करुन खोडसाळपणा केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.