Urse : रेशनचा तांदूळ खुल्या बाजारात विक्रीसाठी नेणाऱ्या पाच जणांवर गुन्हा, 27 लाखांचा तांदूळ जप्त

एमपीसी न्यूज – रेशनचा तांदूळ खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी ट्रकमधून घेत जात असताना पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर शिरगाव पोलिसांनी कारवाई करून 27 लाख 62 हजारांचा तांदूळ पकडला. पाच जणांवर गुन्हा दाखल करत दोन ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. ही कारवाई मंगळवारी (दि. 20) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास उर्से (Urse)टोल नाक्याजवळ करण्यात आली.

Akurdi : कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भारतीय विद्यार्थ्यांना अनेक संधी – डॉ. दीपक शिकारपूर

अशोक लक्ष्मण सोळसकर (रा. रुही, ता. कोरेगाव, जि. सातारा), सचिन वसंत धुमाळ (रा. भाडवे, ता. कोरेगाव, जि. सातारा), राजू नागनाथ केंद्रे (रा. कदारेवाडी, ता. कंधार, जि. नांदेड), गौरव सुंबे (रा. काळेपडळ, हडपसर, पुणे), शहा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार तुकाराम साबळे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा येथून मुंबईला रेशनचा तांदूळ खुल्या बाजारात विक्रीसाठी नेला जात होता. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से (Urse) टोल नाक्याजवळ शिरगाव पोलिसांनी कारवाई करून दोन ट्रक पकडले.

त्यामध्ये रेशनचा तांदूळ भरलेला होता. त्याबाबत चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. 18 लाख रुपये किमतीचे दोन ट्रक आणि 27 लाख 62 हजार 312 रुपये किमतीचा तांदूळ जप्त करण्यात आला आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.