Moshi News : मोशीत उद्या इंद्रायणी साहित्य संमेलन

एमपीसी न्यूज : मोशी येथील जय गणेश बँक्वेट हॉल येथे मोशी ग्रामस्थ व इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने पहिले इंद्रायणी साहित्य संमेलनाचे (Moshi News) उद्या शनिवार 24 डिसेंबर 2022 रोजी आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संमेलनाध्यक्ष अरुण बोऱ्हाडे यांनी दिली आहे.

मोशी ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज मंदिर ते संमेलन स्थळ अशा ग्रंथ दिंडीचे आयोजन सकाळी 8 वा केले आहे. ग्रंथदिंडीचे पूजन  ह.भ.प बाळासाहेब काशीद व विशाल स्वामी सीईओ, विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे करतील. स्वागतध्यक्ष संतोष बारणे यांच्या मातापित्यांची ग्रंथतुला करण्यात येणार आहे. ते ग्रंथ संमेलनास उपस्थित असलेल्या शाळांना देणार येणार आहेत.

लक्ष्मीकांत देशमुख, अध्यक्ष, 91वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. संमेलनाध्यक्ष अरुण बोऱ्हाडे, स्वागताध्यक्ष संतोष बारणे,( Moshi News) आमदार महेश लांडगे, आमदार दिलीप मोहिते पाटील, संदीप तापकीर अध्यक्ष इंद्राणी साहित्य परिषद या वेळेस उपस्थित असतील. भाव भाषा भोवताल या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल. त्यानंतर संमेलनाध्यक्ष अरुण बोऱ्हाडे यांचे अध्यक्षीय भाषण होईल.

Pune News : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त पालिकेच्या योजनांची दिली माहिती

दुसऱ्या  सत्रात सकाळी 11 वाजता भारतीय स्वातंत्र्याच्या मृत महोत्सवानिमित्त राष्ट्रउभारणीत शिक्षकांचे योगदान यावर परिसंवाद होईल. विविध शाळा महाविद्यालयातील मान्यवर अध्यापक व प्राध्यापक यामध्ये सहभागी असतील. पिंपरी-चिंचवड मनपाचे माजी अध्यक्ष  अजित गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती असेल.

तिसऱ्या सत्रात दुपारी 12.30 वाजता रसिकराज, साहित्य कलाप्रेमी, माजी आमदार उल्हास पवार यांची प्रकट मुलाखत घेण्यात येईल. अरुण बोऱ्हाडे लिखित अक्षर प्रतिमेतील प्रज्ञावंत  या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल.

चौथ्या सत्रात दुपारी 2.30 वा निमंत्रितांचे कवी संमेलन होईल. याचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक तुकाराम पाटील हे असतील.दुपारी 4 वा. श्रमसंस्कृती आणि (Moshi News) शब्द संस्कृतीचा मिलाफ यामध्ये समजून अध्यक्ष अरुण बोराडे यांची मुलाखत घेण्यात येईल. प्रज्ञावंत पुरस्कार व भूमिपुत्र पुरस्कार वितरण सोहळा संध्याकाळी 5 वा होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.