Jammu Kashmir : भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदचा तळ उध्वस्त

साऊथ ब्लॉकमध्ये बसून या सर्व कारवाईवर लक्ष ठेवून होते पंतप्रधान मोदी

एमपीसी न्यूज- भारतीय वायुदलाच्या 12 मिराज 2000 या लढाऊ विमानांनी (POK)नियंत्रण रेषा ओलांडून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला करून दहशतवादी तळ नष्ट केल्याच्या वृत्ताला भारतीय संरक्षण खात्याकडून दुजोरा मिळालेला आहे. विदेश सचिव विजय गोखले यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्याचे जाहीर केले. या हल्ल्यामध्ये जैश-ए-मोहम्मद च्या मसूद अझरचा सर्वात मोठा तळ उध्वस्त केला. या हल्ल्यात अतिरेक्यांसह मसूदचे अनेक साथीदार ठार झाले आहेत. बालाकोट भागात जैशच्या तळावर 1000 किलोचे बॉम्ब फेकण्यात आले. सुमारे 21 मिनिटे ही कारवाई करण्यात आली. साऊथ ब्लॉकच्या सिच्युएअशन रुममध्ये बसून पंतप्रधान मोदी या सर्व कारवाईवर लक्ष ठेवून होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.