Kalewadi : कारागिराने पळवली 29 तोळ्याची सोन्याची बिस्किटे

एमपीसी न्यूज – सोन्याचे (Kalewadi) दागिने बनवून देणाऱ्या कारागिरांनी 29 तोळे सोन्याची बिस्किटे दागिने बनविण्यासाठी घेतली. बिस्किटे घेऊन कारागीर बेपत्ता झाले. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 7 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत नढेनगर काळेवाडी येथे घडला.

किसन रेवजी तांबे (वय 51 , रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सॅम्युअल हरजोली हक उर्फ दिपू शेख, रॉनी ताजोद्दीन शेख (सध्या रा. नढेनगर, काळेवाडी. मूळ रा. पश्चिम बंगाल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Akurdi News : आरटीई मार्गदर्शन शिबिरास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलिसांनी दिलेल्या (Kalewadi) माहितीनुसार, फिर्यादी यांचे सोन्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात आरोपी कारागीर म्हणून काम करत होते. तांबे यांनी विश्वासाने आरोपींकडे 16 लाख 64 हजार 883 रुपये किमतीचे 231.152 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे दागिने बनविण्यासाठी दिली. कारागीर आरोपींनी त्या बिस्किटांचे दागिने बनवून न देता घर सोडून पळ काढला. त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला असता तो बंद सांगत असल्याने याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.