Kalewadi : काळेवाडी फाट्यावर स्कूल व्हॅनचा अपघात; चालकासह विद्यार्थी जखमी

एमपीसी न्यूज – काळेवाडी फाटा येथे एका स्कूल व्हॅनचा अपघात (Kalewadi) झाला. यामध्ये स्कूल व्हॅनचा चालक आणि एक विद्यार्थी जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 21) सकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, काळेवाडी फाटा येथून एक ओम्नी स्कूल व्हॅन विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. समोर अचानक वाहन थांबल्याने स्कूल व्हॅनवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि व्हॅनची समोरच्या वाहनाला धडक बसली.

Pune : मी दरवेळी येणार …तेव्हा तुम्ही दरवेळी फटाके वाजवणार का – राज ठाकरे

त्यात व्हॅनचे नुकसान झाले असून चालक आणि एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या अपघातामुळे नागरिकांची गर्दी झाली. तसेच वाहनांच्या रांगा (Kalewadi) लागल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.