Pune : कमलप्रभा चॉईस विरंगुळा केंद्राचे बुधवारी उदघाटन

एमपीसी न्यूज- ‘चॉईस ग्रुप’च्या चॉईस हॉस्टेल फॉर सिनियर्स, कमलप्रभा चॉईस विरंगुळा केंद्राचे बुधवारी (दि. 26) महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे. एनडीए रस्त्यावर वारजे माळवाडी येथे हे सुसज्ज विरंगुळा केंद्र उभारण्यात आले आहे. चॉईस ग्रुपचे संस्थापक जयंतीभाई शहा यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.ज्येष्ठ नागरिक आणि इतर समाज घटकांसाठी समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यासाठी कमलप्रभा चॉईस फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे आहे.

चॉईस गेस्ट हाउसचे उद्घाटन महानगरपालिकेतील शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.हा कार्यक्रम 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. ‘चॉईस हॉस्टेल फॉर सिनियर्स’ मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 28 वातानुकुलीत खोल्या असून 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. योगाभ्यास,संगीतोपचार, आहार मार्गदर्शन, करमणुकीची साधने असणार आहेत.करमणुकीची कार्यक्रम, गप्पा, चर्चा यासाठी खुली जागाही येथे आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी हे विरंगुळा केंद्र दि. 1 मार्च 2020 पासून दुपारी 3 ते 7 यावेळेत सुरु असणार आहे. वैद्यकीय सेवा, योगाभ्यास इत्यादी उपक्रम येथे असणार आहेत.

‘चॉईस ग्रुप’ 1958 पासून पुण्यामध्ये सिमेंट व्यवसाय, केटरिंग,गेस्ट हाउस, बॉईज होस्टेल, फिल्म मेकिंग, कॉमर्स कॉलेज, स्विमिंग पूल, हेल्थ क्लब अशा विविध माध्यमातून काम केले आहे. समाजोपयोगी कामांसाठी कमलप्रभा फौंडेशन स्थापन करून विविध उपक्रम आयोजित करण्याचा मानस असल्याची माहिती जयंतीभाई शहा यांनी पत्रकाद्वारे दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.