Kasarwadi : रिप्लेसमेंटसाठी दिलेल्या आयफोनचा दुकानदाराने केला अपहार

एमपीसी न्यूज – रिप्लेसमेंटसाठी दिलेल्या आयफोनचा दुकानदाराने (Kasarwadi) अपहार केला. ही घटना 4 ऑगस्ट रोजी नाशिकफाटा कासारवाडी येथे घडली.

प्रतिक दिलीप कसबे (वय 23, रा. चिखली) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 9) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोझम युसुफ शेख (वय 23, रा. कुदळवाडी, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kasarwadi : रिप्लेसमेंटसाठी दिलेल्या आयफोनचा दुकानदाराने केला अपहार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख याचे ( Kasarwadi )कुदळवाडी येथे वर्ल्ड सेल्स अॅँड सर्विस या नावाचे दुकान आहे. फिर्यादी यांनी त्यांचा 93 हजार 500 रुपये किमतीचा आयफोन रिप्लेसमेंटसाठी दिला होता. त्यानंतर आरोपीने तो वेळेत दिला नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी मोबाईल परत मागितला. फोन आज देतो, उद्या देतो असे म्हणत आरोपीने वेळकाढूपणा केला. त्यांनतर फिर्यादीस ‘तू पोलिसात तक्रार केली तर तुला सोडणार नाही’ अशी धमकी देत फोनचा अपहार केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.