Kasarwadi : कासारवाडीतील जलतरण तलावात क्लोरीन गॅसची गळती झाल्याने 20 जण गंभीर

श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने वायसीएम रुग्णालयात करण्यात आले दाखल

एमपीसी न्यूज – कासारवाडीतील जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिकेज ( Kasarwadi) झाल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने 20 जणांना उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कासारवाडी येथील बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात क्लोरिन गॅस लिकेज झाला. यामुळे जलतरण तलावात पोहण्यासाठी आलेल्या नागरिकांना श्वास घेण्याचा त्रास झाला. ही घटना मंगळवारी (दि. 10) सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली.

नागरिकांना श्वास घेण्याचा त्रास होतअसल्याची माहिती पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाला ( Kasarwadi) सकाळी 8.38 वाजता मिळाली. त्यानुसार मुख्य केंद्रातील तीन आणि भोसरी उपकेंद्रातील एक असे चार बंब घटनास्थळी दाखल झाले.

Pune : मुक्तांगण शाळेत विद्यार्थ्याचे लैगिंक शोषण, शाळा प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल

तलावातील पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन गॅसचा वापर केला जात होता. गॅसच्या टाकीला छिद्र पडल्याने त्यामधून गॅस गळती झाली आणि पाण्याचा संपर्क आला. ( Kasarwadi) त्यामुळे तलावात गॅस गळती सुरू झाल्याचे सांगण्यात आले.

जलतरण तलावात दररोज सकाळी नागरिक पोहण्यासाठी येतात. मंगळवारी सकाळी तलावात पोहणाऱ्या नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. दरम्यान 20 जणांना उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले आहे.

जलतरण तलावाच्या आजूबाजूला देखील गॅस पसरला. त्यामुळे पोलिसांनी तलावाच्या समोरील रस्ता काही कालावधीसाठी बंद केला. गॅसचा प्रभाव कमी झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी वायसीएम रुग्णालयात जावून उपचारार्थीची भेट ( Kasarwadi) घेवून माहिती  घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.