Pune : मुक्तांगण शाळेत विद्यार्थ्याचे लैगिंक शोषण, शाळा प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पहिलीतील विद्यार्थ्याला त्रास दिल्याप्रकरणी मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलमधील ( Pune) विद्यार्थ्यांविरुद्ध रॅगिंग कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्याच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलमधील वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांसह, मुख्याध्यापिका अनुपमा गुजराती यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : पुणे @ 34 अंश सेल्सिअस, ऑक्टोबर हिटने पुणेकर हैराण

तक्रारदार महिलेचा सहा वर्षांचा मुलगा मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पहिलीत ( Pune) आहे. दोन ते तीन दिवसांपासून शाळेतील वरच्या वर्गातील एक विद्यार्थी आणि त्याचे मित्र पहिलीतील मुलाला त्रास देत होते. त्याला चुकीचा पद्धतीने स्पर्श करत होते.

या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास जीवे मारू, अशी धमकी विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यामुळे मुलगा घाबरला होता, असे तक्रारदार महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.याबाबतची माहिती मुख्याध्यापिका गुजराती यांना देण्यात आली.

मात्र, त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे मुलाची आई आणि अन्य पालकांनी सोमवारी शालेय प्रशासनाला जाब विचारला.

मुलाच्या आईने याबाबत तक्रार दिल्यानंतर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग करण्यास मनाई अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात ( Pune) आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.