Khadakwasla Dam: खडकवासला धरण साखळीच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस

एमपीसी न्यूज : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, वरसगाव, पानशेत व टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत पाणीसाठ्यात (Khadakwasala Dam ) गेल्या 24 तासांत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 32 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

 

 या धरणात सध्या 32.52 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा हे. हे धरण (Khadakwasala Dam) एकूण क्षमतेच्या 58.16 टक्के भरले आहे. टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 165 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या धरणात सध्या 13.47 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून धरण 12.83 टक्के भरले आहे. वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 126 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या धरणात सध्या 89.03 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून धरण 24.52 टक्के भरले आहे. तर पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 126 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या धरणात सध्या 84.29 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून धरण 27.95 टक्के भरले आहे.

 

पावसाचा जोर आणखी चार दिवस कायम राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे या काळात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या वर्षी जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. जून महिन्यात पावासाने चांगलीच ओढ दिल्यामुळे पुणे शहरावर पाणीकपातीचे संकट ओढवले होते. मात्र या आठवड्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.