Khed : पोलीस ठाण्यात तक्रार देतो म्हणून शेतकऱ्याला मारहाण

एमपीसी न्यूज : पोलिस ठाण्यात तक्रार करायला (Khed) गेला म्हणून शेतकऱ्याला सहा ते सात जणांनी बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.13) वासूली फाटा आंबेठाण येथे घडला आहे.

याप्रकरणी प्रमोद पोपट राळे (वय 27, रा.राळेवस्ती, खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सागर जावळे, ऋतीक बोऱ्हाडे, सागर जवळे, चेतन येवले व त्यांचे इतर चार साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari : क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने पाच लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व चेतन यांच्यात जुना पैशांचा व्यवहार होता. यावेळी त्यांच्यात वाद झाले व चेतन याने फिर्यादीचा ट्रॅक्टर जबरदस्ती उचलून नेला. यावरून फिर्यादी हे पोलीस ठाण्यात चेतन विरोधात तक्रार करण्यासाठी जात असताना सागर व इतर आरोपी गाडीतून आले व त्यांनी फिर्यादीला (Khed) अडवले.

तसेच तुझा व चेतनचा काय विषय आहे? अशी विचारणा केली. यावरून फिर्यादी यांनी तुम्ही मध्ये पडू नका, मी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असल्याचे सांगितले. यावेळी आरोपींनी फिर्यादीला मारहाण कऱण्यास सुरुवात केली. यावेळी गर्दी जमली असता कोणी मध्ये पडायचे नाही म्हणत लाकडी दांडक्याने मारहाण केली.

पुढे चेतनही तेथे आला व त्यानेही शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. यावरून महाळुंगे पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.