Sangavi : सासरी जाणे जावयाला पडले महागात, घरातून एक लाखांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – सासऱ्याला पाहण्यासाठी गुजरात (Sangavi) येथे गेलेल्या सांगवी येथील एका कुटुंबाच्या घरी दरोडा पडला. या कालावधीत त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने टिवी, रोख रक्कम असा 1 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

याप्रकरणी संदिप गोपाल टाक (वय 37, रा. जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हि घरफोडी 9 ते 13 एप्रिल या कालावधीत जुनी सांगवी येथे घडली आहे.

Khed : पोलीस ठाण्यात तक्रार देतो म्हणून शेतकऱ्याला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चुलते उमेश करसंग टाक त्यांची पत्नी व दोन मुले हे सासऱ्याला पाहण्यासाठी गुजरात येथे गेले होते. याचाच गैरफायदा घेत चोरांनी घराचा कडी (Sangavi) कोयंडा तोडून घरात प्रवेश केला व घरातील सोन्याचे दागिने, टिव्ही तसेच रोख रक्कम 50 हजार रुपये असा एकूण 1 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.