Khed : विनाकारण एकास दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या (Khed) बाजूला थांबून नातेवाईक तरुणाशी बोलत असलेल्या एका व्यक्तीला विनाकारण दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री नऊ वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील धामणे फाटा कोये येथे घडली.

अरुण गोविंद राळे (वय 59, रा. कोये, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सारंग चोरघे, सत्यवान सोनवणे (दोघे रा. धामणे फाटा, पाईट, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा माणिक वाळुंज हा चिंचवडकडे जाण्यासाठी निघाला तेव्हा फिर्यादी त्यांच्या गाडीवर बसून भाचा माणिक याच्याशी बोलत होते. त्यावेळी आरोपी फिर्यादी यांच्याजवळ आले.

Pimpri : महापालिका शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थी घडवावेत; भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे आवाहन

‘तुम्ही रस्त्यात गाडीवर बसून का बोलता’ असे म्हणत फिर्यादीस (Khed) दम दिला. ‘आम्ही रस्त्याच्या बाजूला थांबून बोलत आहे. तुम्हाला काही अडचण आहे का’ असा जाब फिर्यादी यांनी विचारला असता आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर एकाने दगडाने फिर्यादीस मारहाण करून गंभीर दुखापत केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.