Pimpri : महापालिका शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थी घडवावेत; भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – महापालिका विद्यार्थ्यांमध्ये (Pimpri) गुणवत्ता आहे. मात्र, त्यांना चांगल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने महापालिका प्राथमिक शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षकांना ‘धन्वंतरी’ आरोग्य योजना लागू झाली. शिक्षकांनी आगामी काळात गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी कर्तव्यनिष्ठ रहावे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला महापालिका प्राथमिक शिक्षक आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना धन्वंतरी आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय अखेर महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षक आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

याबाबत भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी शिक्षक संघटनांच्या वतीने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आहे. महापालिका भवन येथे शिक्षक संघटना आणि प्रशासनाची बैठकीत धन्वंतरी योजना लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्या निमित्त शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची कृतज्ञता भेट घेतली आणि या प्रश्नासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात तिसऱ्या परिमंडळास शासनाची मान्यता

यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय येणारे, अनुसूचित जमातीचे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री विलास अंभोरे, पिंपरी चिंचवड मनापा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे सभापती शिवाजी दौंडकर, प्राथमिक शिक्षक परिषदेचे सरचिटणीस मंगेश भोंडवे यांच्यासह सतीश ढमाळ, सतीश गिड्डे, गोरक्षनाथ भांगरे, धर्मेंद्र भंगे, बिभीषण फलफले, शांताराम रोकडे, अनिल सुकाळे, चौगुले सर, शंकर पवार, बाबुराव लांघी आदी उपस्थित होते.

शंकर जगताप म्हणाले की, पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या इतर (Pimpri) विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे प्राथमिक शिक्षण विभागाकडील कार्यरत शिक्षक / सेवानिवृत्त शिक्षकांना कार्यरत शिक्षकास 300 रुपये व सेवानिवृत्त शिक्षकांस 150 रुपये मासिक सभासद वर्गणी कपात करण्यात येईल. त्याआधारे संबंधित कर्मचाऱ्यांना धन्वंतरी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी 2013 च्या धन्वंतरी स्वास्थ योजनेच्या धोरणामध्ये बदल करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.