Chinchwad : चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा

एमपीसी न्यूज : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Chinchwad) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राज्यभरातील रंगकर्मींना रंगमंच उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने आमदार लक्ष्मणभाऊ कला आणि क्रीडा अकादमीच्या माध्यमातून 19, 20 व 21 फेब्रुवारी 2024 रोजी चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे ‘लक्ष्मण जगताप करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली आहे.

या स्पर्धेच्या विजेत्यांना प्रथम क्रमांक 35000 रुपये, मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक 25000 रुपये, मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक 15000 रुपये, मानचिन्ह व प्रमाणपत्र, तसेच उत्तेजनार्थ व लक्षवेधी एकांकिकांना अनुक्रमे 10000 रुपये, 7500 रुपये मानचिन्ह आणि प्रमाणपत्र अशी बक्षिसे वितरीत करण्यात येणार आहेत. या शिवाय दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, उत्कृष्ट लेखक व बालकलाकार अशी वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत.

Pune: पुणे लोकसभेसाठी जगदीश मुळीक, संजय काकडे यांचे नाव आघाडीवर 

या स्पर्धेचे पहिलेच वर्ष आहे. राज्यभरातील मुंबई, नाशिक, सोलापूर, नांदेड, पुणे व पिंपरी-चिंचवड येथून 27 संघांनी स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला आहे. नाट्यगृहाच्या मर्यादित उपलब्धतेमुळे अनेकांना नकार द्यावा लागला. स्पर्धेचे संयोजन नरेंद्र आमले, राजेंद्र गावडे, विजय भिसे, संजय हिरवे आणि चंद्रशेखर जोगदंड हे करत आहेत.

येत्या 19 फेब्रुवारीला सकाळी साडेनऊ वाजता भाजप (Chinchwad) शहराध्यक्ष शंकर पांडुरंग जगताप यांच्या हस्ते आणि इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे. तर, पारितोषिक वितरण 21 फेब्रुवारीला रात्री साडेआठ वाजता होणार आहे. ऑनलाईन नावनोंदणीसाठी क्यूआर कोड स्कॅन करावा किंवा नरेंद्र आमले 8237003953 व संजय हिरवे 8605115777 यांच्याशी संपर्क साधावा. तसेच, शहरातील सर्व रसिक, प्रेक्षकांनी या स्पर्धेतील विविध एकांकिका व नाट्यछटा यांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.