Pune: पुणे लोकसभेसाठी जगदीश मुळीक, संजय काकडे यांचे नाव आघाडीवर 

एमपीसी न्यूज – कोथरूडमधून प्रा. मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी (Pune)मिळाल्यानंतर आता पुणे लोकसभेसाठी माजी आमदार जगदीश मुळीक आणि माजी खासदार संजय नाना काकडे यांचे नाव आघाडीवर आहे. 
ब्राम्हण समाजाची नाराजी दूर करीत कुलकर्णी यांना उमेदवारी दिल्याची (Pune)चर्चा सुरू आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघात ब्राम्हण समाजातर्फे नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पुणे लोकसभेसाठी प्रबळ इच्छुक असलेल्या मुरलीधर मोहोळ यांचे नाव आता मागे पडले आहे.
तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. लोकसभा निवडणुकीत आता मराठा समाजाचा उमेदवार देण्यात येणार असल्याची कुजबुज सुरू आहे.

Pune : पुण्यात पुन्हा बॉम्ब स्फोटाची धमकी

त्या पार्श्वभूमीवर काकडे आणि मुळीक या दोघांत स्पर्धा पाहायला मिळणार आहे. मोहोळ यांनीही उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, कोथरूडमधून ही उमेदवारी मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे. येत्या काही महिन्यांतच पुणे लोकसभा निवडणूक होणार आहे. 2014 पासून पुण्यात मोदी लाट कायम आहे. सलग 10 वर्षे भाजपाचा उमेदवार विजयी होत आहे. यावेळी मात्र निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही.

 

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत माहाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाल्याने विरोधी पक्षांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.