Pune : पुण्यात पुन्हा बॉम्ब स्फोटाची धमकी

एमपीसी न्यूज -पुणे पोलिसांना कॉल करत पुणे शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची (Pune)धमकी एका माथेफिरू कडून देण्यात आली होती . पुण्यातील शिवाजी नगर आणि पुणे स्टेशनसह पिंपरी चिंचवड मध्ये बॉम्बस्फोट करण्यची धमकी त्याने दिली होती.

पुण्यासह मुंबईत देखील बॉम्बस्फोट घडवण्याची कॉल करून धमकी माथेफिरू कडून देण्यात आली होती. कॉल करणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

Ravet : अखेर रावेत येथील क्रिएटिव्ह ॲकॅडमी शाळेचे अनधिकृत बांधकाम भुईसपाट

 

धमकीचा कॉल करणारा माथेफिरू असून अफवा पसरवल्याचं पोलीस तापासात उघड झालं. कॉल करणारा व्यक्ती हा हडपसर भागात राहणारा असून तो माथेफिरू असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.