Talegaon Dabhade : रोटरी आपल्या दारी उपक्रमांतर्गत शिक्षकांचा गौरव

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या (Talegaon Dabhade) वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा गौरव करण्यात आला. रोटरी सिटी परिवारातील प्रत्येक शिक्षकाच्या निवासस्थानी जाऊन सन्मानचिन्ह व मिठाई देऊन त्या सदस्यांच्या परिवारासोबत अनोख्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा केला.

शिक्षक दिनाचे महत्त्व, शिक्षकांचे समाजातील स्थान, नवीन पिढी घडवणारा घटक, समाजाशी सर्वात जवळीक असणारा घटक इत्यादी माहिती रोटरी सिटीचे अध्यक्ष रो.सुरेश शेंडे, संस्थापक अध्यक्ष रो.विलास काळोखे, ज्येष्ठ रोटेरियन संजय मेहता, मेंबरशिप डायरेक्टर रो.संतोष परदेशी, रो.विश्वास कदम, रो. सुनंदा वाघमारे, रो.संजय वाघमारे इत्यादींनी मनोगताद्वारे विशद करताना सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Chinchwad : पिंपरी चिंचवड विद्यापीठात जपानमधील आयटी संधीवर मार्गदर्शन

प्रत्येक शिक्षकाच्या घरी जाऊन कुटुंबासमवेत यथोचित (Talegaon Dabhade) सन्मान केल्याने रोटरी सिटीचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

रो.भगवान शिंदे, रो.रघुनाथ कश्यप, रो.शरयू देवळे, रो.संगीता शिरसाट, रो. मधुकर गुरव, रो.दशरथ ढमढेरे, रो.कमल ढमढेरे,रो.रितेश फाकटकर, रो.वर्षा खारगे, रो.चेतन पटवा इत्यादी गुणवंत शिक्षक आपापल्या क्षेत्रामध्ये ज्ञानदानाचे काम करताना रोटरी सिटीमध्ये प्रत्येक उपक्रमात योगदान देत असतात.

अशा रोटरी परिवारातील शिक्षकांचा गुणगौरव सोहळा 5 सप्टेंबर रोजी अनोख्या पद्धतीने साजरा झाला. गौरव प्राप्त शिक्षक व कुटुंबीयांनी रोटरी सिटीचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.