Maval : मावळ तालुक्यात प्रथमच महिला नियोजनाची दहीहंडी

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ (Maval) येथील सह्याद्री फाउंडेशन यांच्या वतीने यावर्षी प्रथमच महिला नियोजनाची दहीहंडी आयोजित करण्यात आली. दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, लोणावळा येथील गोविंदा पथकांनी हजेरी लावली. यानिमित्ताने मावळ तालुक्याने प्रथमच महिला नियोजनाची दहीहंडी अनुभवली. महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अध्यक्ष सुनील ढोरे यांनी यावर्षी महिलांची कमिटी तयार केली.

वडगांव शहर हे मावळ तालुक्याचे मुख्यालय असून नेहमीच धार्मिक, सांस्कृतिक,सामाजिक,क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर राहिलेले आहे. शहरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे सह्याद्री फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. या वर्षी आगळा वेगळा उपक्रम म्हणून महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम अध्यक्ष सुनील ढोरे यांनी केले. त्याप्रमाणे या वर्षाचे संपूर्ण कमिटी महिलांची केली.

कार्यक्रमचे उद्घाटन माजी आमदार विलासराव लांडे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देण्यासाठी खासदार श्रीरंग आप्पा बारणे,आमदार सुनील आण्णा शेळके, जि.प.माजी सभापती बाबुराव आप्पा वायकर,जी.प.सदस्य चंद्रशेखर भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे,भाजप अध्यक्ष रवींद्र भेगडे,शिवसेना प्रमुख राजेश खांडभोर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष दिपाली गराडे,माजी उपसभापती गणेश आप्पा ढोरे,मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसाकार, उपसभापती प्रवीण चव्हाण, संचालक सुभाषराव जाधव शहर अध्यक्ष प्रवीण ढोरे तसेच तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर,वडगांव शहरातील सर्व माजी नगरसेवक,माजी सरपंच,माजी ग्रा. प.सदस्य उपस्थित होते.

Talegaon Dabhade : रोटरी आपल्या दारी उपक्रमांतर्गत शिक्षकांचा गौरव

या दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई,ठाणे, नवी मुंबई,लोणावळा येथील गोविंदा पथकांनी हजेरी लावली. या वेळी शुभेच्छा देताना (Maval) खासदार व आमदार यांनी बोलताना सांगितले की,आम्ही तालुक्यात व परिसरात विविध मंडळांना भेटी दिल्या परंतु या ठिकाणचा हा महिलांचा सहभाग मोठा आहे.या बद्दल विशेष कौतुक केले. यावेळी अभिनेत्री मालविका गायकवाड,स्मिता शेवाळे यांनी हजेरी लावली.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष सुनीता दत्तात्रय कुडे,कार्याध्यक्ष पद्मावती राजेश ढोरे,पदाधिकारी वैशाली ढोरे,मीनाक्षी ढोरे,रेखा दंडेल, माजी नगरसेविका माया चव्हाण,पूजा वहिले,प्रियांका खैरे,वैशाली कुडे, निशा कडू,सुवर्णा दौंडे, आकांक्षा वाघवले,अमृता म्हाळस्कर,माधुरी निकम,गौरी गुरव,सारिका ढोरे,करुणा पवार आदी महिलांनी नियोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.