PimpleSaudagar : उन्नतीच्यावतीने पतंग बनविण्याची कार्यशाळेचे आयोजन

एमपीसी न्यूज – मकर संक्रात निमित्त मोठ्या प्रमाणात चायना बनावटीचे पतंग व मांजा बाजारात दाखल झाला आहे .या मांज्यामुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक पक्षी जखमी झाले आहेत त्यामुळे पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फौंडेशनच्या वतीने टाकाऊ पासून टिकावू या धोरणाचा अवलंब करीत रद्दी पासून व झाडूच्या काड्या पासून पतंग बनविण्याची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 

यात परिसरातील शेकडो मुलांनी सहभाग घेतला त्याच बरोबर पालकांनीही मोठा सहभाग नोंदविला . यात संध्या कार्तिक हिने पहिला क्रमांक मिळविला तर लावण्या सागर काटे हिचा दुसरा क्रमांक आला, विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकांना ट्राफी व सन्मानपत्र देण्यात आले.

पतंग बनविण्याचे कार्यशाळा रामदास शिंदे यांनी घेतली ,पतंगासाठी  लागणारे कागत कसे कापावे,त्यासाठी काड्या कुठल्या प्रकारचे असावे ,तसेच त्याला कशा प्रकारे चिटकावे असे अनेक प्रकार त्यांनी सांगितले व मुलांकडून पतंग करून घेतले. यावेळी चायना बनावटीचा माजा न वापरता साधा दोरा वापरण्याबद्दल मुलांची व पालकांची जनजागृती करण्यात आली, मागील अनेक वर्षांपासून चायना मांजामुळे अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागत  असल्याच्या प्रकारात दिवसे दिवस वाढ होत आहे. यावर मात झाली पाहिजे म्हणून पालकांनी देखील मुलांना चायना माज्या खरेदी करण्या पासून रोखावे असे आवाहन करण्यात आले.

यावेळी उन्नतीच्या अध्यक्षा कुंदा भिसे,संस्थापक संजय भिसे,माधुरी वाणी ,संदीप वाणी,सागर काटे,बाबासाहेब साळुंके,अभिजित परब,आत्माराम भालेकर,प्रशांत पाटील,प्रशांत साळवे, योगेश मेखा,प्रवीण कासोदेकर आदी सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.