Laxman Jagtap : आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन; भाजपचा हरहुन्नरी नेता हरपला

एमपीसी न्यूज – आमदार मुक्ता टिळक यांच्या पाठोपाठ भाजप समर्थकांसाठी मोठी दु:खदायक बातमी समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचे निधन झाले आहे. जगताप हे कर्करोगाची झुंज देत होते आज अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांचे वय 59 होते. बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी 9 वाजून 29 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. लक्ष्मणभाऊ या नावाने ते परिचित होते. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील मोठे नेते म्हणून जगताप यांची ओळख होती. महापालिकेत 20 वर्षे नगरसेवक होते. त्यांनी सन 2000 मध्ये पिंपरी-चिंचवड शहराचे महापौरपद भूषविले. महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. सन 2004 मध्ये पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष निवडून येत  त्यांनी विधानपरिषदेत प्रतिनिधीत्व केले. 2009 मध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि पहिल्याच निवडणुकीत लक्ष्मण जगताप अपक्ष निवडून आले. दरम्यान 2014 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी शेतकरी कामगार पक्ष (शेकाप), मनसेच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविली. पण, त्यात त्यांचा पराभव झाला.


MLA Laxman Jagtap

आमदार लक्ष्मण जगताप यांनी रुग्णवाहिकेतून थेट पीपीई कीट घालून विधानभवनात दाखल झाले होते. आणि मतदान केले होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचे श्रेय त्यांना आणि मुक्ता टिळक यांना दिले होते. खऱ्या अर्थी पक्षासाठी झटणारा भाजपचा नेता हरपला.  


त्यानंतर 2014 मध्येच त्यांनी तत्कालीन भाजप नेते आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.  2014 च्या विधानसभा निवडणुकीत चिंचवडमधून भाजपच्या चिन्हावर ते निवडून आले. शहरातील भाजपचे ते पहिले आमदार झाले. 2019 च्या निवडणुकीतही भाजपकडून निवडून येत ते चौथ्यांदा आमदार झाले. लक्ष्मण जगताप हे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक होते. पण, 2014 मध्ये त्यांनी पवारांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.

Pune News : खड्यामुळे अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी – दिवाणी न्यायालय

2017 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीकडून (Laxman Jagtap) महापालिका खेचून आणण्यात जगताप यांची मोठी भूमिका होती. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच महापालिकेवर भाजपचे कमळ फुलले होते. शहराचे नेते म्हणून जगताप यांच्याकडे पाहिले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपचे शहराध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.  त्यांचे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे होते. अनेकांना त्यांनी नगरसेवक केले. महापालिकेतील महत्वाची पदे दिली.

मागील वर्षभरापासून आमदार लक्ष्मणभाऊ आजारी होते. आजारपणामुळे ते जास्त बाहेर फिरत देखील नव्हते. काही दिवसांपासून त्यांच्यावर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.