Pune News : खड्यामुळे अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी – दिवाणी न्यायालय

एमपीसी न्यूज : खड्यामुळे दुचाकी घसरून अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना 16 लाख रुपये 16 टक्के व्याजासह नुकसान रुपये देण्याचा आदेश येथील (Pune News) दिवाणी न्यायाधीशांनी पुणे महानगरपालिकेला दिला आहे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस.एस.शिंदे यांनी हा निकाल दिला.

यश दिनेश सोनी (वय 20) यांचा या अपघातात मृत्यू झाला होता. याबाबत त्यांचे वडील दिनेश फुलचंद सोनी (वय 52, रा.औरंगाबाद) यांनी पुणे महानगरपालिके विरोधात दिवाणी स्वरूपाचा दावा दाखल करत एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती.

यश हा 26 जून 2016 रोजी त्याच्या दुचाकीवरून संचेती हॉस्पिटल चौकाकडून कामगार पुतळा चौकाकडे जात होता. शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात आला असता त्यांची दुचाकी एका मोठ्या खड्ड्यामुळे घसरली. अपघातानंतर घसरत गेल्याने डिव्हायडरजवळ असलेला दोन फुटांचा अर्धवट कापलेला लोखंडी रॉड यश यांच्या छातीला लागला. त्यामुळे या अपघातात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.

Talegaon Dabhade : रोटरी सिटीच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

सार्वजनिक रस्त्यांची योग्य देखभाल करून रस्ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिका आपली जबाबदारी पार पाडण्यास अपयशी ठरल्याने अर्धवट कापलेल्या लोखंडी रॉडमुळे यशचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, असा दावा सोनी यांनी केला होता.

यश हा निष्काळजीपणे व वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता दुचाकी चालवत होता. अतिवेगामुळे त्याचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले आणि त्याने लोखंडी सेपरेटरला धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला होता. (Pune News) न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत महानगरपालिकेने सोनी यांच्या कुटुंबायांना 16 लाख 20 हजार रुपये नुकसान भरपाई आणि 15 हजार रुपये अंत्यविधीचा खर्च 16 टक्के व्याजासह दावा दाखल केल्याच्या तारखेपासून द्यावा, असा आदेश दिला.

न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे :

लोखंडी डिव्हायडर योग्य स्थितीत ठेवणे व त्याचा आकार योग्य ठेवणे व देखभाल ठेवणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे

संबंधित लोखंडी रॉड व लोखंडी सेपरेटर संबंधी महापालिकेने जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली नाही

महापालिकेच्या निष्कर्षीपणामुळे अपघात झाला

डिव्हायडरचा लोखंडी रॉड छातीला लागल्याने यश यांचा मृत्यू झाला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.