Talegaon Dabhade : रोटरी सिटीच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने 7 मे 2023 रोजी सामुदायिक विवाह सोहळा निश्चित करण्यात आला आहे. (Talegaon Dabhade) त्या अनुषंगाने 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात डिस्ट्रिक्ट फाउंडेशन डायरेक्टर रो.नितीन ढमाले, रोटरी सिटीचे अध्यक्ष रो.दिपक फल्ले, प्रकल्प प्रमुख रो विलास काळोखे, क्लब ट्रेनर रो.दिलीप पारेख, सेक्रेटरी सुरेश शेंडे,रो संतोष शेळके,रो किरण ओसवाल यांचे हस्ते नारळ वाढवून नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमास रो मिलिंद निकम, रो विनोद राठोड,रो राकेश ओसवाल,रो प्रशांत ताय,रो संजय वाघमारे,रो आनंद पूर्णपात्रे हे उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ तळेगांव सिटी घेत असलेला उपक्रम गोरगरीब जनतेसाठी फार उपयुक्त आहे पुणे शहरातील क्लबची मदत घेऊन 100 लग्न सोहळ्यात लावण्याचा मनोदय रो.नितीन ढमाले यांनी व्यक्त केला. समाजातील दानशूर व्यक्तींनी या उपक्रमाला सर्वोतोपरी मदत करावी असे प्रतिपादन रो.नितीन ढमाले यांनी केले.

RTO : आरटीओमध्ये लायसन्स स्मार्ट कार्डचा तुटवडा

क्लबच्या सामुदायिक विवाह सोहळा उपक्रमाची माहिती अध्यक्ष रो.दिपक फल्ले यांनी प्रास्ताविकातून विशद केली.

यामध्ये सहभागी होणाऱ्या वधूवरांसाठी मोफत गॅस शेगडी,गॅस सिलेंडर, संसार उपयोगी भांड्यांचा संच, वधू वरांचा संपूर्ण पोशाख, भाग्यवान वधू व वर यांना तीन मोबाईल लकी ड्रॉ द्वारे काढण्यात येणार आहे, भाग्यवान वधू-वरांस लकी ड्रॉ द्वारे गोदान करण्यात येणार आहे. सर्व वधू-वरांना सोन्याची नथ भेट देण्यात येणार आहे. सर्व वधू-वरांना साखरपुडा व लग्नाचा पूर्ण पोशाख मोफत देण्यात येणार आहे. वधू-वरांची भव्य शोभायात्रा, वधूवरांना विवाह प्रमाणपत्र,वऱ्हाडी लोकांसाठी अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था हळदी,साखरपुडा व लग्नासाठी भव्य प्रशस्त मंडप अशा सर्व सुविधा रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने देण्यात येणार आहे.

मावळ पंचक्रोशीतील गोरगरीब,दिन दुबळ्या,आदिवासी भागातील नागरिकांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोहोचवावी व लवकरात लवकर विवाह नोंदणी करावी असे आवाहन अध्यक्ष दीपक फल्ले यांनी केले.सूत्रसंचालन रो.भगवान शिंदे यांनी केले ‌तर आभार रो.शाहीन शेख यांनी मानले.(Talegaon Dabhade) कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी रो.रेशमा फडतरे,रो.शरयु देवळे, रो.सुनंदा वाघमारे,रो प्रसाद पादिर रो.सुरेश दाभाडे,रो.प्रदीप टेकवडे,रो प्रसाद बानगुडे,रो तानाजी मराठे, रो.विजय सातकर,रो.सौरभ मेहता यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.