RTO : आरटीओमध्ये लायसन्स स्मार्ट कार्डचा तुटवडा

एमपीसी न्यूज – परिवहन विभागात सध्या लायसन्सच्या स्मार्ट कार्डचा तुटवडा पडला आहे. पिंपरी-चिंचवडसह राज्यभरात हा तुटवडा पडला असून, ट्रान्सपोर्ट (RTO) आणि टुरिस्ट टॅक्सी, प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहन चालकांना पर्मनंट लायसन्स चालन टेस्टसाठी वेळच दिली जात नाही. तर, काही प्रमाणात खासगी लायसन्स मिळवण्यासाठी सुद्धा अडचणींचा सामना करावा लागत आहे.

परिवहन विभागाने दोन कंपन्यांना स्मार्ट कार्ड पुरवण्याचे कंत्राट दिले आहे. त्यापैकी एका कंपनीकडून स्मार्ट कार्डचा अपुरा पुरवठा असल्याने राज्यभरात ही समस्या निर्माण झाल्याचे परिवहन अधिकार्‍यांनी सांगितले आहे.अनेक नागरिक आरटीओ कार्यालयात ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण करण्यासाठी अर्ज करतात. मात्र, स्मार्ट कार्ड च्या तुटवड्यामुळे त्यांना ड्रायव्हिंग टेस्टची वेळ सुद्धा दिली जात नाही. गेल्या एक महिन्यापासून ही समस्या भेडसावत आहे. ट्रान्सपोर्ट आणि टुरिस्ट टॅक्सी चालकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.

Pune News : ससूनचे निवासी डॉक्टर संपावर ; मार्डच्या संपामुळे रुग्णसेवा विस्कळीत

लायसन्स चे स्मार्ट कार्ड पुरवण्यासाठी दोन कंपन्यांना काम देण्यात आले आहे. एका कंपनीला 24 तर दुसर्‍या कंपनीला 26 आरटीओ कार्यालयातील काम देण्यात आले आहे. त्यापैकी एका कंपनीकडून पुरवठा कमी केला जात असल्याने काही दिवसांपासून काहीच ठिकाणी स्मार्ट कार्डची समस्या निर्माण झाली आहे. (RTO) या संदर्भात पुरवठादार कंपनीला सूचना केल्या असल्याचे परिवहन अधिकार्‍यांनी सांगितले आहे. आरटीओ कार्यालयात लायसन्सची प्रिंट उशिरा होत असल्यामुळे ट्रान्सपोर्ट आणि हेवी ट्रान्सपोर्ट लायसन्स चे पर्मनंट लायसंनची तारीख मिळत नाही. त्यामुळे लायसन्स धारकांना पुन्हा लर्निग लायसन्स काढण्याची वेळ आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.