Pune News : ससूनचे निवासी डॉक्टर संपावर ; मार्डच्या संपामुळे रुग्णसेवा विस्कळीत

एमपीसी न्यूज : राज्यातील निवासी डॉक्टरांच्या महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स (मार्ड) या संघटनेने पुकारलेल्या संपामध्ये पुण्यातील ससून सर्वोपचार (Pune News) रुग्णालयातील निवासी डॉक्टरही सहभागी झाले आहेत. रुग्णालयातील सुमारे 600 निवासी डॉक्टर या संपात सहभागी झाले असून राज्य सरकारकडून अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याबाबत योग्य ती कार्यवाही होत नसल्याने हा संप पुकारण्यात आल्याचे मार्डकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

निवासी डॉक्टरांचा संप असल्याने अतिदक्षता विभाग आणि अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित कामकाज बंद ठेवण्यात येणार असल्याचे मार्डकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Today’s Horoscope 03 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

राज्य शासनाने ज्येष्ठ निवासी डॉक्टरांसाठी 1432 पदांची निर्मिती करावी, निवासी डॉक्टरांसह वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहांची दुरवस्था तातडीने दुरुस्त करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. निवासी डॉक्टरांनाही सातव्या वेतन आयोगाप्रमाणे (Pune News) महागाई भत्ता द्यावा, कनिष्ठ आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करण्यात यावी तसेच करोना काळात निवासी डॉक्टरांनी बजावलेल्या वैद्यकीय सेवेचा थकबाकी मोबदला तातडीने देण्यात यावा, अशा मागण्या मार्डकडून समोर ठेवण्यात आल्या आहेत.

विविध मागण्यांसाठी संप करतानाच अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विस्कळीत होऊ न देणे आणि रुग्णांची गैरसोय न करणे हा आपला प्राधान्यक्रम असल्याचे ससून मार्ड शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.