Pune News : “आम्ही इथले कोण आहोत माहित आहे का…”, म्हणत पोलिसाचीच कॉलर धरली

एमपीसी न्यूज : रात्री उशिरापर्यंत भर रस्त्यात स्पीकर वाजून डान्स करत असणाऱ्या टोळक्याला रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाच धक्काबुक्की करण्यात आली. (Pune News) इतकेच नाही तर एका पोलीस कर्मचाऱ्यांची कॉलर धरून त्याला शिवीगाळ करण्यात आली. खडकीतील त्यागी शाळेसमोर दोन डिसेंबरच्या रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सुमित सुभाष मिश्रा, रसल अल्विस जॉर्ज, वृषभ अशोक पिल्ले, निशांत संजय गायकवाड आणि सिद्धार्थ महादेव लोहान या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन समरत बेदगुडे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

Laxman Jagtap : आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन; भाजपचा हरहुन्नरी नेता हरपला

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि त्यांचे सहकारी रात्रगस्त घालत असताना त्यागी शाळेसमोर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आरोपी सार्वजनिक ठिकाणी स्पीकरवर गाणे वाजून नाचत होते. या ठिकाणी स्पीकरवर कोणते गाणे वाजवायचे यावरूनही त्यांच्यात भांडण सुरू होती.त्या ठिकाणी गेलेल्या या पोलिसांनी त्यांना स्पीकर बंद करा असे सांगितले.

यावरून आरोपींनी अरेरावीची भाषा वापरून फिर्यादी यांच्या अंगावर धावून आले. पोलीस शिपाई जाधव यांच्या सरकारी गणवेशाची कॉलर धरत आम्ही कोण आहोत तुम्हाला माहित (Pune News) आहे का असे विचारले. इतकेच नाही तर आरोपींनी हम्रही तुम्ही करत फिर्यादींच्या सरकारी गाडीची चावी देखील काढून घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.