Pune Crime : पुणे हादरले ! 30 वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून

एमपीसी न्यूज : पुन्हा एकदा पुणे शहर खुनाच्या घटनेने हादरले आहे. शहरातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तीस ते पस्तीस वर्षे वयाच्या महिलेचा (Pune Crime) दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPC News Podcast 03 January 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पूर्व परिसरातील मेफेअर एलिगंजा सोसायटीच्या समोर असणाऱ्या एका रिकाम्या प्लॉटमध्ये या महिलेचा मृतदेह सापडला. (Pune Crime) मयत महिला अंदाजे 30 ते 35 वर्षाची आहे. चेहऱ्यावर दगडाने वार करून या महिलेचा चेहरा संपूर्णपणे विद्रूप करण्यात आला आहे. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह एका झुडपात फेकून देण्यात आला होता. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.