Pimpri Crime : प्रेम प्रकरणातून पिंपरी चिंचवडमधील वकिलाची हत्या

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवडमधील गायब झालेल्या वकिलाची हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचं, पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. संबधित महिलेच्या पतीनेच वकिलाचे अपहरण करून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

शिवशंकर दत्तात्रय शिंदे (वय 45, रा.बोराडे वस्ती, मोशी) असे बेपत्ता झालेल्या वकिलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हे वकील असून काळेवाडी पिंपरी पुलाजवळ त्यांचे कार्यालय आहे. 31 डिसेंबर रोजी दुपारी शिंदे हे बेपत्ता झाले. शोध घेऊनही ते न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी वाकड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. दरम्यान महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवर एक अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे.

Pune Crime : पुणे हादरले ! 30 वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून

शिवशंकर शिंदे यांचे त्यांच्या नात्यातील महिलेशी संबंध होते. वकील शिवशंकर शिंदेंचं लग्न झालेलं आहे, असं असताना ही त्यांचं नात्यातील एका महिलेशी प्रेमसंबंध होते. एवढेच नाही तर त्या महिलेचे दहा वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. मात्र असे असतानाही वकील आणि त्या महीलेने आपल्या नात्यात दुरावा आणला नाही.

मात्र कालांतराने ती महिला आपल्या पतीपासून वेगळी राहू लागली. त्यावर वकील असलेल्या शिवशंकर शिंदे यांनी त्या महिलेच्या पतीला घटस्फोट घे नाही तर आत्महत्या कर अशी धमकी वारंवार देत होता. या गोष्टीचा राग त्या संबंधित महिलेच्या पतीच्या मनात होता. त्यावरून त्याने वकिलाचा काटा काढण्याचे ठरवले.

त्यानुसार त्यांनी वकिलाचे 31 डिसेंबरच्या दुपारी वकिलाच्या कार्यालयातून अपहरण केले. त्यांचे हात-पाय अन तोंड बांधून एका ड्रम मध्ये बसवले. मग हा ड्रम एका टेम्पोत टाकून नांदेड जिल्ह्याच्या टोकाला आणले अन तिथंच अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. मात्र हत्या कधी झाली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नसून त्याबाबत पोलिस तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.