Alandi : चला एका तरी वृक्ष लावूया, भारताची निसर्गसंपत्ती अधिक वाढवूया: कैलास केंद्रे

माझी वसुंधरा 4.0 अभियानाची उत्तम सुरुवात

एमपीसी न्यूज – पर्यावरण संवर्धनासाठी अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी या पाच तत्वावर आधारित “माझी वसुंधरा” हे अभियान राज्य शासना मार्फत राज्यभर दरवर्षी राबविल जाते. आळंदी (Alandi) नगरपरिषदेने 100 देशी वृक्षांची लागवड करून माझी वसुंधरा 4.0 अभियानाची उत्तम सुरुवात केली आहे.

PCMC :  स्मार्ट सिटीमार्फत शहरातील ५ लाख  मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण

आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी  कैलास केंद्रे यांच्या उपस्थितीत शाळा क्रमांक 1 च्या परिसरात वड, पिंपळ, करंज, बकुळ, बदाम अश्या 100 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्ष लागवड मोहिमेचे वैशिष्टय म्हणजे संपूर्ण वृक्ष हे 8 ते 10 फूट इतक्या उंचीची व देशी प्रजातीची आहेत.

 

तसेच यांच्या संवर्धनाची जबाबदारी देखील शालेय मुलांवर सोपविली आहे. वाढत्या शहरीकरणाच्या युगात शालेय मुलांना वृक्ष लागवड व पर्यायाने पर्यावरण संवर्धना चे महत्व लक्षात यावे तसेच शाळेच्या परिसराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी शहरातील शाळा परिसरात वृक्ष लागवड करण्यास प्राधान्य दिल्याचे मुख्याधिकारी केंद्रे यांनी सांगितले.

 

ही वृक्षारोपण मोहीम यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता शीतल जाधव, शहर समन्वयक किरण आराडे, प्रज्ञा सोनवणे, पाटोळे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

निसर्गातील प्रमुख घटक म्हणजे झाडे होय! पण अन्य देशांच्या तुलनेत दरडोई असलेली वृक्षांची संख्या भारतात फारच कमी आहे. भारताचे नागरिक म्हणून यात आपणच बदल घडवू शकतो.

चला एका तरी वृक्ष लावूया, भारताची निसर्गसंपत्ती अधिक वाढवूया.अशी प्रतिक्रिया आज दि.28 जुलै रोजी जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.