HB_TOPHP_A_

Lonavala : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक आज दुपारी दोन तास बंद

259

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर आज, शुक्रवारी पुण्याच्या दिशेकडील लेनवर ओव्हरहेड गँट्री बसवण्याचे काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी 12  ते 2 या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. ही वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात येईल.

HB_POST_INPOST_R_A

या कामासाठी दुपारी 12 ते 2 च्या दरम्यान या मार्गावरील वाहतूक शेडुंग फाटा इथून जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर वळवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी शेडुंग फाटा, आजिवली चौक, दांड फाटा चौक, कर्जत फाटा आणि खालापूर फाटा येथून खालापूरमार्गे परत खालापूर टोलप्लाझा इथून पुण्याकडे जावे, अस महामार्ग पोलिसांनी कळवल आहे. या कालावधीत अवजड वाहनांना द्रुतगती मार्गावरील चिखले ब्रिजपासून मागे थांबवण्यात येणार आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: