Mahalunge : टेम्पो चोरून पळून जात असताना अपघात झाला आणि चोरटा अडकला पोलिसांच्या तावडीत

एमपीसी न्यूज – पार्किंगमधून टेम्पो चोरून घेऊन जात असताना (Mahalunge) अपघात झाला आणि चोरटा पोलिसांना सापडला. हा सारा प्रकार बुधवारी (दि.27) रात्री महाळुंगे येथील लॉजीस्टीक प्रा.ली.कंपनी येथे घडला आहे.

याप्रकरणी माऊली दत्तात्रय फटे (वय 35 रा.चाकण) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पिर्याद दिली आहे. यावरून गजानन नागेराव मस्के (वय 26, रा.येरवडा, मुळ यवतमाळ) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा ट्रान्सपोर्ट मधील 6 लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो पार्कींग मधून चोरून नेला. पुढे खराबवाडी येथील पुजा कास्टीग कंपनी येथे सुरक्षारक्षकाला धडक दिली.

Bhor : प्रधानमंत्री जनधन योजनेच्या अंमलबजावणीसाठी भोर तालुक्यात सर्वेक्षणाला सुरूवात

या अपघातात आरोपीला अटक करण्यात आली व चोरीचा गुन्हा देखील उघडकीस (Mahalunge) आला. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.