Mahalunge : परस्पर जमीन विकल्या प्रकरणी भावंडांवर गुन्हा

एमपीसी न्यूज –  परस्पर जमीन विकली म्हणून भावंडांवर (Mahalunge) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 मार्च रोजी खेड तालुक्यातील भांबोली येथे घडली आहे.

याप्रकरणी संजय कचरू नवरे (वय 53 रा. भांबोली) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून महिला आरोपी, पांडुरंग ज्ञानेश्वर खुटाळ, सचिन संतराम नाईकनवरे व त्यांचे 7 ते 8 साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Pune : वेताळ टेकडी टिकली पाहिजे : आदित्य ठाकरे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या भावंडाच्या मालकीची 111 गुंठे जमीन आहे. आरोपींनी फिर्यादींना कोणतीही कल्पना न देता 49 गुंठे जमीन विकली व शिल्लक शेतजमिनी पैकी 17.35 गुंठे जमीन जी फिर्यादी , त्यांची आई व मयत बहिणीच्या नावावर असताना देखील आरोपींनी बाऊन्सर घेवून येत जबरदस्तीने कपांऊड घालण्यास सुरुवात केली.

 

त्यांना फिर्यादीने विरोध केला असता फिर्यादीस शिवीगाळ करत धमकी दिली. यावरून (Mahalunge) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.