Pimple Gurav: वृक्षांची लागवड करून बुद्ध पौर्णिमा साजरी

एमपीसी न्यूज – पिंपळेगुरव येथील बुद्धभूषण सेवा संघ आणि  मराठवाडा जनविकास संघ एकसंघ समिती पिंपळे गुरव,पिंपरी-चिंचवड, शहर,पुणे आणि मित्रपरिवार यांच्यावतीने बुद्धविहार पिंपळेगुरव येथे  पिंपळाच्या पाच फूट(Pimple Gurav) उंचीचे,चाफा,कडूलिंब,करंज,नारळ वृक्षांची लागवड करून बुद्ध पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.

Dighi : जमीन अतिक्रमण व मारहाण प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल

वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा ही निसर्ग आणि अध्यात्म याची अनुभूती देणारा दिवस आहे. त्याच दिवशी गौतम बुद्धांना बोधी वृक्षाखाली आत्मअनुभूतीचा साक्षात्कार झाला आणि तोच बोधी वृक्ष म्हणजे पिंपळ (Pimple Gurav)या वृक्षाची लागवड करण्यात आली. यावेळी शशिकांत दुधारे, रमेश जाधव, अरुण पवार, पुनाजी रोकडे, मनोहर कांबळे, गौतम रोकडे, यंकाप्पा कटीमनी, गोरख साळुंके, शिवाजी कांबळे, सुरेश भालेराव, आण्णाराव गायकवाड, आण्णाराव उबाळे, राजेंद्र जानराव, विजय गरजमल, सुभेदार साबळे, बंडू ससाणे, मोहन कांबळे, प्रशांत खिराडे तसेच बुद्धविहार येथील सर्व पदाधिकारी उपस्थित हजर होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.