Dighi : जमीन अतिक्रमण व मारहाण प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – जमिनीवर अतिक्रमण करत मारहाण (Dighi) केल्या प्रकऱणी दिघी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.5) दुपारी वडमुखवाडी येथे घडली आहे.

पहिल्या तक्रारीत समीर प्रभाकर तापकीर (वय 45 रा.तापकीर वस्ती) यांनी फिर्यांद दिली असून महेश किरण डोंगरे, स्वनिल राजेंद्र शेळके, राहूल बसवराज सर्जन, कुणाल नितीन कानडे व 5 महिला आरोपी, काशिनाथ दत्तू तापकीर, प्रसादगुरुनाथ भालेराव व त्याचे 4 ते 5 साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला असून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीच्या जमिनीवर जेसीबी च्या सहाय्याने रस्ता खोदून घरातील महिलांच्या अगांवर धावून जात शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

AAP : आमदार लोगोचा गैरवापर; विनापरवाना लोगो लावणाऱ्या वाहन मालकांवर फौजदारी कारवाई करा

तर दुसऱ्या तक्रारीत काशिनाथ दत्तू तापकीर (वय 69 रा. वडमुखवाडी) यांनी फिर्याद दिली असून साग प्रभाकर तापकीर, राजेश प्रभाकर तापकीर, सचिन साहेबराव तापकीर, स्वप्नील साहेबराव तापकीर, सुनील काळुराम तापकीर, साहेबराव सिताराम तापकीर, नंदकुमार धोंडीबा तापकीर, राहूल साहेबराव तापकीर, गणेश ज्ञानेश्वर तापकीर,प्रसाद ज्ञानेश्वर तापकीर, मनेश नंदराम तापकीर, रमेश नंदराम तापकीर, आठ महिला आरोपी असा एकूण 20 जणां विरोधात तक्रार दिली आहे.

या फिर्यादीत म्हटले आहे की, महापालिकेने मोजून दिलेल्या मोजणीनुसार कंपाऊंड करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करत असताना आरोपींनी जेसीबी ड्रायव्हरला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच जमिन विक्री केलेल्या महेश (Dighi) डोंगरे यांनाही शिवीगाळ व दमदाटी केली. यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.