Pune : वेताळ टेकडी टिकली पाहिजे : आदित्य ठाकरे

वेताळ टेकडीची आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी

एमपीसी न्यूज-पुण्यातील नदी सुधार प्रकल्प,वेताळ टेकडी, मुंबईतील (Pune) आरे,बारसू या सर्व ठिकाणी सध्या जी काही परिस्थिती दिसत आहे.त्यातून एकच म्हणावे लागले की,जनते विरुद्ध हुकुमशाही दिसत आहे.त्यामुळे पुण्यासह राज्यभरात जिथे कुठे प्रकल्प सुरू असतील त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या मनात त्या प्रकल्पाबाबत नेमक्या काय भावना आहेत हे महापालिका प्रशासनाने राज्य सरकारपर्यंत पोहोचण्याची गरज आहे.त्यानंतरच पुढील पावले उचलली पाहीजे;अन्यथा एखाद्या दिवशी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे पुण्यातील वेताळ टेकडी टिकली पाहिजे,अशी भूमिका ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मांडली.

वेताळ टेकडी येथील प्रस्तावित असलेल्या बालभारती ते पौडफाटा रस्ता,दोन बोगदे या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी पुण्यात वेताळ टेकडी कृती समितीच्या वतीने मागील महिन्यात वेताळ बाबा चौक ते खांडेकर चौक दरम्यान लाँग मार्च काढण्यात आला होता.त्या लाँग मार्चमध्ये शहरातील विविध भागातील पर्यावरण प्रेमी सहभागी झाले होते.त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील वेताळ टेकडीवर जाऊन परिसराचा पाहणी केल्यावर पर्यावरण प्रेमी सोबत चर्चा केली होती. या सर्व घडामोडी दरम्यान ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे हे पुणे दौर्‍यावर आज आले होते. त्यावेळी त्यांनी वेताळ टेकडीवर जाऊन पाहणी केली.

 

Akurdi : रामनगर परिसरातील खाण बर्ड व्हॅलीच्या धर्तीवर विकसित करा – विशाल काळभोर

 

त्यावेळी पर्यावरण प्रेमी सोबत चर्चा केल्यावर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मागील सहा ते सात महिन्यात आपल्या राज्यात भ्रष्ट्राचार आणि अनियमितता आहे. विकासाचा आणि स्थानिक नागरिकांचा विचार न करता लाठी काठी,दमदाटीने सर्व प्रकार सुरू आहे. आपल्यासाठी ते भयानक असल्याचे सांगत शिंदे फडणवीस सरकारवर त्यांनी निशाणा साधला.

तसेच ते म्हणाले ,नदी सुधार प्रकल्पा दरम्यान एक ही झाड काढले जाणार नसल्याचे सुरुवातीच्या काळात सांगण्यात आले होते.पण आता जवळपास 7 हजार झाड काढली जाणार आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा (Pune) ऱ्हास होणार आहे. हे कशा प्रकारे रोखता येईल हे पाहणे जरुरीचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.