Talegaon Dabhade : रवींद्र काळोखे यांची कार्यालयीन अधीक्षक पदी नियुक्ती

एमपीसी न्यूज-  तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील सभा (Talegaon Dabhade) कामकाज अधीक्षक रवींद्र काळोखे यांची कार्यालयीन अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे पत्र मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी काळोखे यांना दिले. काळोखे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम 1965च्या कलम 77 (1) नुसार कार्यालयीन कामकाजाच्या सोयीसाठी नेमणूक देण्याचे अधिकार मुख्याधिकारी यांना असल्याने त्यांनी काळोखे यांची कार्यालयीन अधीक्षक (हेडक्लार्क) म्हणून नियुक्ती केली आहे.

Mahalunge : परस्पर जमीन विकल्या प्रकरणी भावंडांवर गुन्हा

या पत्रामध्ये काळोखे यांच्यावर पूर्वी करत असलेल्या सभा कामकाज अधीक्षक व दैनंदिन आवक-जावक विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत असताना, शासकीय कार्यक्रम जसे महापुरुषांची जयंती, प्रजासत्ताक दिन,स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन इत्यादीचे वेळोवेळी येणाऱ्या शासन आदेशाप्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन करून घेणे, वरिष्ठ कार्यालयाकडून मागविण्यात येणारी माहिती प्राप्त होणारे ई-मेल,गुगल शीट सर्व संबंधित विभागाकडून वेळेत पाठवले जातील याची दक्षता घेणे, त्याचप्रमाणे कार्यालयीन शिपाई यांचे कामकाजाचे आवश्यकतेनुसार नियोजन करणे आदी जबाबदारी सोपवलेली आहे.

काळोखे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत.या अगोदर त्यांनी कामगार (Talegaon Dabhade) सोसायटीवर देखील अध्यक्ष पद भूषविले आहे. त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडतील असा नगरपालिका कर्मचाऱ्यांनी विश्वास व्यक्त करून आनंद व्यक्त  केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.