Pune : छे छे मी त्यांना उत्तरच देत नाही – आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांचा नितेश राणे यांना टोला

एमपीसी न्यूज-मागील पंधरा दिवसापासून बारसू प्रकल्पावरून सत्ताधारी विरुद्ध ( Pune ) विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे.आता याच बारसू प्रकल्पावरून तुमच्यावर टीका केली आहे,असे विचारताच ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, छे छे मी त्यांना उत्तरच देत नाही आणि मी त्या पातळीला जातच नाही, अशा शब्दात नितेश राणे यांना त्यांनी टोला लगावला.

Talegaon Dabhade : रवींद्र काळोखे यांची कार्यालयीन अध्यक्षपदी नियुक्ती

ते  म्हणाले ,आपण ते पत्र वाचल असेल तर त्यामध्ये कुठे ही अस लिहिले नाही की जनतेवर लाठी काठी चालवा,दादागिरी करा. बुलेट ट्रेन प्रकल्पा वेळी आदिवासी महिलांना बाहेर काढण्यात आले. हे प्रकार महाविकास आघाडीच्या काळात झाले नाही.

याच पुण्यात वेदांत प्रकल्प आणणार होतो.पण तो प्रकल्प गुजरात येथे पाठविण्यात आला.यासह अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले आहेत.तर जे प्रकल्प नको आहेत,ते आपल्यावर लादले जात असल्याचे सांगत शिंदे फडणवीस सरकारवर त्यांनी टीका ( Pune ) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.