Maharashtra Corona Update : राज्यात आज 42,320 जणांना डिस्चार्ज; 22,122 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यात बरे होणा-या रुग्णांची संख्या सातत्याने अधिक नोंदवली जात आहे. आज राज्यात (सोमवारी, दि.24) 42 हजार 320 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच, आज दिवसभरात 22 हजार 122 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 56 लाख 02 हजार 019 एवढी झाली आहे. त्यापैकी 51 लाख 82 हजार 592 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, सध्या राज्यात 3 लाख 27 हजार 058 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज राज्यात 361 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 89 हजार 212 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.59 टक्के एवढा आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून, सध्या 92.51 टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यात आतापर्यंत 3 कोटी 32 लाख 77 हजार 290 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 27 लाख 29 हजार 301 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 24 हजार 932 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.