Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 7 नवे रुग्ण; 4 मृत्यू , 23 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत आज, सोमवारी 7 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, बरे झालेल्या 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 107 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने सोमवारी (दि.24 ) सायंकाळी साडे सात वाजता कोरोना अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

या अहवालानुसार आज एकूण चार मृत्यू कळाले. यात गांधीनगर येथील 64 वर्षीय महिलेचा मृत्यू हा 19 मे रोजी नोंद झालेला आहे. तर थॉमस कॉलनी येथील 45 व 54 वर्षीय पुरुषाचा मृत्यू अनुक्रमे 23 आणि 22 मे ला नोंद झाला असून थॉमस कॉलनी येथील येथील 62 वर्षीय महिलेचा मृत्यू 23 मे ला नोंद झाला आहे.

आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 2712 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 2 हजार 539 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हद्दीत आजवर 66 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 107 सक्रिय रुग्ण असून, त्यापैकी सध्या 22 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर, 48 रुग्ण होम आयसोलेट आहेत तर, 37 रुग्णांवर महात्मा गांधी स्कूलमधील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

आज आढळलेले नवीन रुग्ण

गांधीनगर (1),मेन बाजार (1), इंद्रलोक बिल्डिंग (1) (2), शीतलानगर नं 1(1), संकल्प नगरी (1).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.