Maval Corona Update : रुग्णसंख्या मंदावतेय, दिवसभरात 75 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात सोमवारी (दि.24) 75 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 155 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज ग्रामीण भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नाही पण मागील 30 दिवसात 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत 432 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2202 आहे.

शहरी भागात 24 तर ग्रामीण भागात 51 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 9 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 15 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंत ची एकूण संख्या 21,457 झाली आहे. तर दिवसभरात 155 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कुणे नामा 6, दहिवली 4, गहूंजे 4, सुदुंबरे 4, तळेगाव दाभाडे ग्रामीण 4, टाकवे बुद्रुक 3, नागाथली 3, बुधवडी 3, खांड 2, सोमाटणे 2, निगडे 2, फळणे 2 वाडीवळे 2,परंदवडी, माऊ, ओझर्डे, साते, वडेश्वर, नवलाख उंब्रे, डाहुली, घोणशेत, नाने व कार्ला प्रत्येकी 1 असे एकूण 51 रुग्ण सापडले.

18,824 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 432 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7029, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3747 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1102 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 11,878 रुग्ण तर ग्रामीण भागात 9579 रुग्ण आढळून आले आहेत. 1 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 87.73 टक्के आहे तर मृत्यू दर 2.01 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 814लोणावळा नगरपरिषद मध्ये 166 वडगाव नगरपंचायत मध्ये 73 व ग्रामीण भागात 1149 असे एकूण 2202 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.