Maharashtra : राज्यात दुष्काळाची केंद्रीय पथकाकडून पहाणी पूर्ण; निवडणुकीपूर्वी केंद्राकडून राज्याला मदत अपेक्षित

एमपीसी न्यूज – राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती (Maharashtra) असल्याचे केंद्रीय पथकाच्या पाहणीतून समोर आले आहे. कमी पाऊस झाल्याने त्याचा पीक पेरणीवर परिणाम झाला आहे. जनावरांसाठी चारा, पिण्याच्या पाण्याची पातळी खालावली आहे.

पुढील दोन-तीन दिवसांत अहवाल तयार करून तो केंद्राला पाठविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 2600 कोटींची मदत मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. राज्यात सन 2019 मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी केंद्राकडे सात हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी केंद्राने 4771 कोटींची मदत केली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी केंद्राकडून राज्याला मदत देण्याची अपेक्षा या वेळी राज्यातील अधिकाऱ्यांनी पथकाकडे व्यक्त केली.

PMC : टॅक्स लावण्याचे अधिकार मुख्य सभेच्या मान्यतेनंतर आयुक्तांना आहेत – उज्ज्वल केसकर

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यात आलेल्या केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाची पाहणी पूर्ण झाली. या पथकाने पुणे विधानभवन येथे राज्यस्तरीय आढावा बैठक घेतली. यावेळी राज्याच्या मदत व (Maharashtra) पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी, विभागीय आयुक्त सौरभ राव, कृषी आयुक्तालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पशुसंवर्धन आयुक्तालय, पाणीपुरवठा विभाग आदी अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.