Kiwale : बारा लाख रुपयांच्या अमली पदार्थासह एकाला अटक

एमपीसी न्यूज – किवळे येथे एका आरोपीला 55 ग्राम एमडी (Kiwale) आणि गांजा अशा तब्बल 12 लाख रुपयांच्या अमली पदार्थासह अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी(दि.14) खंडणी विरोधी पथकाने केली. 

मोसीन मोहम्मद खान (वय 38, रा.लोणावळा) असे अटक आरोपीचे नाव आहे. याबरोबरच पोलिसांनी या प्रकरणात दीपक सूर्यवंशी उर्फ कोळ्या या दोघांविरोधात रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार विजय रंगनाथ नलगे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खान हा किवळे येथील श्री बापदेव महाराज उड्डाणपूला जवळ संशयितरित्या थांबला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 55 ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन (Kiwale) व 1 हजार 100 ग्रॅम वजनाचा गांजा, तीन मोबाईल असा एकूण 12 लाख 7 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला.

खान याने हे अमली पदार्थ विक्रीसाठी आणले होते. त्याने हे पदार्थ नवी मुंबई येथील दीपक उर्फ कोळ्या याच्याकडून आणल्याचे मान्य केले. दोन्ही आरोपी विरोधात रावेत पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.