IAS Sanket Bhondve : ‘हमारा संकल्प विकसित भारत’ मोहिमेअंतर्गत योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा

एमपीसी न्यूज – भारत सरकारच्या ‘हमारा संकल्प विकसित भारत’ या महत्वकांक्षी ( IAS Sanket Bhondve) योजनेअंतर्गत सनदी अधिकारी संकेत भोंडवे यांची सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. भोंडवे यांनी शुक्रवारी दोन्ही जिल्ह्यांना भेट देत कामांचा आढावा घेतला. योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या.

सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांच्यासह दोन्ही जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘हमारा संकल्प विकसित भारत’ हे भारत सरकारच्या योजनांची परिपूर्तता साधुन उपक्रमांद्वारे जनजागृती करणारी एक राष्ट्रव्यापी मोहीम आहे. संपूर्ण भारतातील सर्व ग्रामपंचायती, नगर पंचायती आणि शहरी, स्थानिक राज्य संस्थांचा समावेश आहे.

Maharashtra : राज्यात दुष्काळाची केंद्रीय पथकाकडून पहाणी पूर्ण; निवडणुकीपूर्वी केंद्राकडून राज्याला मदत अपेक्षित

अपरिचित लोकांपर्यंत पोहोचणे – विविध योजना अंतर्गत पात्र असलेल्या परंतु (IAS Sanket Bhondve) आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल लोक जागरूकता निर्माण करणे, नागरिकांकडून अभिप्राय घेणे- सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांची त्यांच्या वैयक्तिक कथा, अनुभवांच्या देवाण-घेवाणीद्वारे संवाद साधने, यात्रे दरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे, या उद्देशांसह भारत सरकारची विविध मंत्रालये, विभाग, राज्य सरकार, केंद्र सरकार, यांच्या सक्रिय सहभागाने संपूर्ण सरकारी दृष्टिकोन स्वीकारून ही मोहीम हाती घेतली असल्याचे भोंडवे यांनी सांगितले. दोन्ही जिल्ह्यातील तळागाळातील घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविण्याच्या सूचनाही भोंडवे यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.