Pune : सुरेश कलमाडी यांच्यानंतर काँग्रेसची पुणे लोकसभा मतदारसंघावरील पकड निसटली

एमपीसी न्यूज – माजी खासदार सुरेश कलमाडी (Pune) यांच्यानंतर काँग्रेसची पुणे लोकसभा मतदारसंघावरील पकड निसटली. 2014 आणि 2019 मध्ये पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकला. खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त आहे. गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होणे अपेक्षित होते. पण, या जागेवर काही पोटनिवडणूक झाली नाही. त्यामुळे काही महिन्यातच येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभेचा खासदार कोण असेल यासाठी आता सर्वच पक्षातून मोर्चे बांधणीला सुरूवात झाली आहे.

2014 पासून या लोकसभा मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकत आहे. सुरेश कलमाडी यांच्यानंतर काँग्रेसची पुणे लोकसभेवरची पकड निसटली झाली. मोदी लाटेत अनिल शिरोळे आणि त्यानंतर गिरीश बापट यांनी पुणे लोकसभेवर विजय मिळवला. मुख्यत: काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच पुणे लोकसभेत लढत होते.

यावेळी बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा निवडणूक घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी, आमदार रविंद्र धंगेकर, महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी यांच्या नावाची चर्चा आहे. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबापेठ मतदारसंघात पोटनिवडणूक झाली.

IAS Sanket Bhondve : ‘हमारा संकल्प विकसित भारत’ मोहिमेअंतर्गत योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा

त्यामध्ये भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा काँग्रेसचे आमदार (Pune) रविंद्र धंगेकर यांनी पराभव केला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबापेठ मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. त्यामुळे भाजपचा पराभव होऊ शकतो, असा संदेश विरोधी पक्षांना मिळाला आहे. उच्च न्यायालयाने आदेश पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. तरीही निवडणूक होणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.