Pune : पिण्याचा पाईप कट करून पाणी बंद केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : फिर्यादी घरी नसताना त्यांच्या घराचा (Pune) पिण्याच्या पाण्याचा पाईप कट करून पाणी बंद केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.12) म्हाळुंगे येथील श्रॉफ सोलेनी फ्लॅट येथे घडला.

याप्रकरणी राजेंद्र भाऊसाहेब खानविलकर (वय 70, रा मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.15) फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी पाण्याचे कनेक्शन कट करणारा प्लंबर, सिक्युरिटी गार्ड सुशील सिंग, सायली ढेरे व इतर कमिटी मेंबर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Pune : सुरेश कलमाडी यांच्यानंतर काँग्रेसची पुणे लोकसभा मतदारसंघावरील पकड निसटली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी हे घरी नसताना आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांच्या जागेचे नुकसान केले व पाईप कट करून पाणी बंद करत फिर्यादी यांच्या जागेत अतिक्रमण करून नुकसान केले. यावरून पोलिसांनी (Pune)आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.