Chakan News : महाराष्ट्र केसरी शिवराजचा चाकण मध्ये सन्मान

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांचा चाकण मध्ये विविध सामाजिक संघटना व नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. मागील आठवड्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. फायनलमध्ये खेड तालुक्याचा सुपुत्र शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडचा पराभव केला. (Chakan News) महाराष्ट्र केसरी ही प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते.  महाराष्ट्र केसरीच मैदान मारणारा शिवराज हा खेड तालुक्यातील तिसरा सुपुत्र ठरला आहे. त्यामुळे संपूर्ण खेड तालुक्यात त्याचे जोरदार अभिनंदन होत आहे.  

चाकण मधील मार्केटच्या सभागृहात शिवराज राक्षेचा सन्मान करण्यात आला. यावेळी अडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष कुमार गोरे, जमीर काझी, बाजार समितीचे संचालक राम गोरे यांच्यासह सर्व अडते , व्यापारी, शेतकरी उपस्थित होते. स्व.आ.सुरेशभाऊ गोरे जनसंपर्क कार्यालयात शिवराज याचा सन्मान करण्यात आला. यावेळी महा. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Chakan News : म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याला मान्यता  

नितीन गोरे यावेळी म्हणाले कि,  शिवराज यांनी स्वत:च्या शरीरावर खूष कष्ट घेतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र केसरीचा किताब त्यांना मिळाला असून पुढे ते हिंद केसरी होतील (Chakan News) अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवराज याच्या जबरदस्त कामगिरीची दखल घेत त्यांना क्रीडारत्न पुरस्कार स्व. आ. गोरे प्रतिष्ठाण कडून देण्यात आला होता. दरम्यान प्रतिष्ठाणच्या वतीने शिवराज यांना 25 हजारांचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.