Chakan News : म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याला मान्यता  

एमपीसी न्यूज : चाकण औद्योगिक भागासाठी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याला अखेर गृह विभागाकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे म्हाळुंगे पोलीस चौकी (Chakan News) आता म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे होणार आहे.

चाकण ( ता. खेड , जि.पुणे )  पोलीस ठाण्याचे विभाजन करून म्हाळुंगे पोलिस चौकीची निर्मिती चार वर्षांपूर्वी (जुलै 2019) करण्यात आली होती. आता या चौकीला पोलीस ठाण्याची मान्यता मिळाली आहे. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाईट चौकीच्या अंतर्गत असलेली सर्व गावे नवीन महाळुंगे एमआयडीसी पोलीस चौकीत समाविष्ट करण्यात आली आहे.  महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात  48 गावांचा समावेश असून उर्वरित केवळ 23 गावे चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणार आहेत.

Narendra Modi Visit : पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर

चाकण मधील औद्योगिकरणामुळे चाकण- महाळुंगे परिसर संवेदनशील झाला आहे. यादृष्टीने एमआयडीसी भागात स्वतंत्र पोलीस ठाणे असावे असे मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु होते. चाकण एमआयडीसीसाठीच्या महाळुंगे इंगळे (ता.खेड) येथील नवीन पोलीस ठाणे निर्मितीचा नवीन प्रस्ताव (Chakan News) पिंपरी-चिंचवड आयुक्तालय अस्तित्वात आल्यानंतर पोलीस ठाण्यांच्या भौगोलिक सीमा बदलाची अभ्यास प्रक्रिया केल्यानंतर शासनाकडे पाठवण्यात आला होता.  मात्र चार वर्षापूर्वी डीजी कार्यालय स्तरावरून केवळ महाळुंगे साठी नवीन चौकीला मान्यता देण्यात आली होती. तेंव्हा पासून चाकण पोलीस ठाण्याच्या अंकित महाळुंगे चौकी कार्यान्वित होती. आता एमआयडीसी भागासाठी नवीन पोलीस ठाणे अस्तित्वात येणार आहे.

चाकण व महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गावे पुढील प्रमाणे

चाकण पोलीस स्टेशन गावे : 

चाकण, मेदनकरवाडी, कडाचीवाडी, रासे, भोसे, शेलगाव ,पिंपळगाव तर्फे खेड ,मोहितेवाडी ,सिद्धेगव्हाण , दौंडकरवाडी,  रोहकल ,पिंपरी खुर्द, गोनवडी, बिरदवडी, नाणेकरवाडी ,चिंचोशी ,साबळेवाडी ,बहूळ, काळुस ,वाकी बुद्रुक, संतोष नगर (भाम) ,वाकी खुर्द ,कुरूळी,  (पुणे नशिक हायवे च्या पूर्वेकडील बाजू).

महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गावे :

म्हाळुंगे, खराबवाडी, आंबेठाण, बोरदरा ,भांबोली ,वराळे ,वासुली, कोरेगाव खुर्द, शिंदे ,सावरदरी, खालुम्ब्रे ,सांगुर्डी ,येलवाडी ,कान्हेवाडी तर्फे चाकण, मोई, निघोजे, कुरूळी ( पुणे नाशिक हायवेच्या पश्चिमेकडील बाजू ),   कुरकुंडी ,तळवडे ,आसखेड बुद्रुक, आसखेड खुर्द, शेलु, करंजविहीरे, धामणे, पाईट, कोये, वाकी तर्फे वाडा, वाहागाव, देशमुखवाडी, वाघू, कोळीये, कान्हेवाडी खुर्द, पराळे, कोहिंडे खुर्द, गडद, वेल्हावळे, रौंधळवाडी,  आखतुली, आडगाव, पाळू, अनावळे ,कासारी, टेकवडी, हेदृज, तोरणे बुद्रुक, अहिरे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.