Narendra Modi Visit : पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर

एमपीसी न्यूज : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता.19) मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या वेळी विविध विकासकामांचा नारळ फुटणार आहे. त्यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, 400 किमी (Narendra Modi Visit) रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे आणि रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. तर मेट्रो 2 , मेट्रो 7 आणि 20 आपला दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदानात डिजीटल पध्दतीने भूमीपूजन आणि लोकार्पण पार पडेल. त्यानंतर पंतप्रधानांची सभाही होणार आहे. यावेळी पंतप्रधान मेट्रो मार्गाने काही अंतर प्रवासही करणार आहेत. पंतप्रधानांच्या कार्यक्रमांसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मुंबई महापालिका यंत्रणेने पूर्ण तयारी केली आहे. मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

Pune News : बारामतीत आजपासून भरणार कृषी प्रदर्शन

दरम्यान, या दौऱ्यावरून विरोधकांकडून टीकाही करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणारी बरीचशी कामं ही महाविकास आघाडीच्या काळात झाली असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.