Pune News : बारामतीत आजपासून भरणार कृषी प्रदर्शन

एमपीसी न्यूज : बारामतीत आजपासून कृषी प्रदर्शनाची (Pune News) सुरुवात झाली आहे. हे कृषी प्रदर्शन 19 ते 22 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांसाठी खुलं असणार आहे. 

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्र, (KVK) अटल इनक्युबेशन सेंटर, मायक्रोसॉफ्ट व लंडन ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिक 2023 या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन 19 ते 22 जानेवारी दरम्यान खुले राहणार आहे. 3 ते 18 जानेवारी यादरम्यान स्टार्टअप किंवा इतर इन्होव्हेटर यांच्याकरिता वेबीनारचे आयोजन केरण्यात आले होते. कृषिक प्रदर्शनात मायक्रोसॉफ्टमार्फत बारामती येथे उभारण्यात येणाऱ्या सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन फार्मव्हाइब्ज’ या कृषी संशोधन प्रकल्पातील अनेक प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना, उद्योजकांना दाखवण्यात येणार आहेत.

MPC News Podcast 19 January 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

170 एकरवर या कृषिकचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, आयओटी, प्रिसिसीअन अॅग्रीकल्चरल, व्हर्टिकल फार्मिंग, ग्रामीण शेतकरी, रोबोटचा कृषी क्षेत्रात वापर, दुग्ध आणि फळप्रक्रिया क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, क्लायमेट स्मार्ट अॅग्रीकल्चर प्रॅक्टिसेस, दूध आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग, मिलेट दालन असं अनेक उपक्रम पाहण्याची संधी मिळणार आहे.

या कृषी प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यांतून लाखो शेतकरी भेट देण्यासाठी येत असतात. त्यासाठी 170 एकरांवरील पीक प्रात्यक्षिक पाहतानाचा शेतकरी फ्लो, त्याचबरोबर पार्किंग व्यवस्था, येणाऱ्या शेतकऱ्यांची भोजन, चहा नाश्ता तसेच लांबून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या निवासाची (Pune News) व्यवस्था करण्यात आली आहे. प्रदर्शनामध्ये प्रत्येक प्लॉटवर त्या पिकाचे माहितीचे बोर्ड, तसेच त्या ठिकाणी माहिती देणारी व्यक्ती असणार आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध उपक्रम पाहता येतील. 23 जानेवारीला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार या प्रदर्शनास भेट देणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.